JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / ...तरी आपण सुरक्षित नाही, धोका कायम; मोदी सरकारने राज्यांना केलं सावध

...तरी आपण सुरक्षित नाही, धोका कायम; मोदी सरकारने राज्यांना केलं सावध

काही राज्ये कोरोना लॉकडाऊन नियम शिथील करण्याच्या तयारीत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची (Coronavirus in India) प्रकरणं लक्षणीयरित्या कमी झालेली आहेत. कोरोना लसीकरण (Corona vaccination in India) सुरू होऊन पाच महिने उलटले आहेत. लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे, लसीकरणाला वेगही देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी हळूहळू लॉकडाऊनचे (Corona lockdown) नियम शिथील करायला सुरुवात केली आहे. राज्यांची निर्बंध हटवण्याची तयारी सुरू असतानाच मोदी सरकारने राज्यांना अलर्ट केलं आहे. कोरोनाची प्रकरणं घटत असली तरी धोका अजून टळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. कोरोनाची देशातील सद्यपरिस्थिती काय आहे, याबाबत केंद्र सरकार पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी सांगितलं, “कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. केंद्राची टीम काही राज्यांमध्ये पाठवण्यात आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण देश सुरक्षित नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही.  कोरोनाविरोधातील लढा अद्यापही सुरू आहे. आपण तिसऱ्या लाटेची तयारी करत आहोत. पण तिसरी लाट येणार की नाही हे आपल्या हातात आहे”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या