चिपळूण, 29 मे: महाराष्ट्र राज्य कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं शहरासह ग्रामीण भागातही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातच चिपळूणमध्येही कोरोनानं थैमान घातलं आहे. दरम्यान कोकणातला चिपळूण तालुका (Chiplun taluka) कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. तालुक्यातील तब्बल 17 गावं कोरोनाची (Corona Hotspot) हॉटस्पॉट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. चिपळूणमधील 17 गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं प्रशासनानं त्या गावांना कोरोना हॉटस्पॉट असं जाहीर केलं. यात गावांमधील विविध वाड्यांचा समावेश आहे. तर शहरातील मार्कंडी येथील एक तुलसी अपार्टमेंट कोरोना हॉटस्पॉट ठरली आहे. चिपळूण शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. सुरुवातील ग्रामीण भागातल्या 7 गावांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख पाहता त्या गावांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आणि तिथे कडक निर्बंध लावण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्यानं वाढत चालला आहे. त्यामुळे तालुक्यातील 17 गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. हॉटस्पॉट ठरलेली गावं पिंपळी खुर्द चिंचघरी पिंपळी बुद्रुक पेढांबे पेढे पोफळी वालोपे शिरगाव सावर्डे खेर्डी खडपोली अलोरे कापसाळ कामथे बुद्रुक मुर्तवडे वहाळ तर या गावांतर्गत असणाऱ्या अनेक वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत 671 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४४५ गृह अलगीकरणामध्ये आहेत तर 15 जणांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात तालुक्यात 204 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. हेही वाचा- डिसेंबरपर्यंत राज्य सरकारनं निर्बंध उठवण्याची घाई करु नये, नाहीतर… आतापर्यंत 315 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. तर एकूण 8 हजार 209 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 7 हजार 223 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत.