JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / अरे बापरे! फक्त एका लिफ्टमुळे एकट्या महिलेनं नकळत 71 जणांना केलं कोरोना संक्रमित

अरे बापरे! फक्त एका लिफ्टमुळे एकट्या महिलेनं नकळत 71 जणांना केलं कोरोना संक्रमित

बीजिंग, 14 जुलै : सध्या बहुतेक कोरोना (coronavirus) रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. कोरोना शिंकताना-खोकताना तोंडावाटे निघणाऱ्या थेंबांच्या संपर्कात आल्यास पसरतो असं असताना आता तो हवेमार्फतही पसरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केलं आहे. दरम्यान आता चीनमधील एका प्रकरणानं चिंता अधिक वाढवली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना, सुरुवातीला कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आलेली असताना आणि पूर्ण खबरदारी घेऊनदेखील एका महिलेनं तिच्या नकळत एक-दोन नव्हे तर तब्बल 71 जणांना कोरोना संक्रमित केलं आहे आणि याला कारणीभूत ठरली ती लिफ्ट (lift) चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ने या प्रकरणाचा अभ्यास केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 14 जुलै : सध्या बहुतेक कोरोना (coronavirus) रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. कोरोना शिंकताना-खोकताना तोंडावाटे निघणाऱ्या थेंबांच्या संपर्कात आल्यास पसरतो असं असताना आता तो हवेमार्फतही पसरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केलं आहे. दरम्यान आता चीनमधील एका प्रकरणानं चिंता अधिक वाढवली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना, सुरुवातीला कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आलेली असताना आणि पूर्ण खबरदारी घेऊनदेखील एका महिलेनं तिच्या नकळत एक-दोन नव्हे तर तब्बल 71 जणांना कोरोना संक्रमित केलं आहे आणि याला कारणीभूत ठरली ती लिफ्ट (lift) चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ने या प्रकरणाचा अभ्यास केला. 19 मार्चला ही अमेरिकेहून चीनच्या हेलोंगजिआंगमध्ये परतली. तिची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आली. तरीदेखील या महिलेनं खबरदारी म्हणून स्वत:ला घरात क्वारंटाइन केलं. विशेष म्हणजे जेव्हा ती आपल्या घरी परतली तेव्हादेखील ती लिफ्टमध्ये एकटीच गेली. तिच्यासह दुसरं कुणीच नव्हतं. मात्र तिनं लिफ्ट वापरल्यानंतर थोड्यावेळाने तिच्या शेजाऱ्यांनी लिफ्टचा वापर केला आणि हीच लिफ्ट कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरली असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. एका लिफ्टमुळे असा पसरला कोरोना अमेरिकेहून परतलेल्या महिलेनं बिल्डिंगमधील लिफ्टचा वापर केला, त्यावेळी ती एकटीच होती. ज्या लिफ्टमधून ती महिला गेली त्याच लिफ्टमधून थोड्या वेळाने तिच्या शेजारी राहणारी व्यक्ती गेली, महिला आणि तिच्या शेजारी राहणारी व्यक्ती थेट एकमेकांच्या संपर्कात आली नव्हती. यानंतर ज्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्या लिफ्टचा वापर केला, तिला भेटण्यासाठी 26 मार्चला तिची आई आणि तिचा बॉयफ्रेंड आला, जे दोघंही नंतर 29 मार्चला एका पार्टीत गेले. पार्टीतील एका व्यक्तीला स्ट्रोक आल्याने 2 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याची दोन्ही मुलंही रुग्णालयात त्याची देखभाल करत होते.  6 एप्रिलला या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमेरिकेहून परतलेल्या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या आईच्या बॉयफ्रेंडमध्ये 7 एप्रिलला कोरोनाची लक्षणं दिसू लागली. हे वाचा -  इंग्लंड, फ्रान्समध्येही आता mask बंधनकारक; नाहीतर होणार ही शिक्षा दरम्यान अमेरिकेहून परतलेली महिला वगळता या सर्वांनी कुठेही परदेशी प्रवास केला नव्हता किंवा ते कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नसल्याचं आढळलं. त्यामुळे अमेरिकेहून परतलेल्या त्या महिलेची पुन्हा चाचणी करण्यात आली. सुरुवातीला या महिलेची टेस्ट नेगेटिव्ह होती मात्र अँटिबॉडी टेस्टमध्ये ती पॉझिटिव्ह होती. याचा अर्थ तिला आधी कोरोना झाला होता. मात्र तिच्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. लक्षणं न दिसणाऱ्या या कोरोना संक्रमित महिलेकडून लिफ्टच्या माध्यमातून तिच्या शेजाऱ्यांपर्यंत हा कोरोना पोहोचला आणि तो त्यांच्या माध्यमातून पसरत गेला. 71 जणांना व्हायरसची लागण झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या