JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / भारतीय Zydus Cadila कंपनीने लॉंच केलं सर्वात स्वस्त कोरोना औषध, जाणून घ्या किती आहे किंमत

भारतीय Zydus Cadila कंपनीने लॉंच केलं सर्वात स्वस्त कोरोना औषध, जाणून घ्या किती आहे किंमत

फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे (Remdesivir) सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लॉच केले आहे.

0106

फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे (Remdesivir) सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लॉच केले आहे.

जाहिरात
0206

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, झायडसने त्याची 100mg औषध 2,800 रुपये ($37.44) किंमतीसह लॉंच केल आहे. जगातील बर्‍याच देशांमधील रुग्णालयांमधील क्लिनिकल चाचण्या दरम्यान, रेमडेसिव्हीर कोरोना रुग्णांवर उपायकारक सिद्ध झाली आहे.

जाहिरात
0306

रेमडेसिव्हीरमुळे कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवस होऊ शकतो. यामुळेरेमडेसिव्हीर मागणी वाढली आहे. मात्र तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की हे प्रभावी उपचार नाही. पण कोणतेही औषध नसताना डॉक्टर कोरोना येथील रुग्णांसाठी हे औषध लिहून देत आहेत. यामुळे दिल्ली आणि भारतातील इतर शहरांमध्ये त्याची मागणी वाढली आहे.

जाहिरात
0406

अमेरिकेतील गिलियाड सायन्सेसने इबोलाच्या उपचारासाठी रेमडेसिव्हीर औषध तयार केले. आता भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स आणि मायलोन यांना हे औषध भारतात तयार करण्याची परवानगी दिली आहे.

जाहिरात
0506

दुसरीकडे Zydus Cadilaने आपली कोव्हि़ड-19 लस ZyCoV-D ची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागांतील 1000 लोकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

जाहिरात
0606

कंपनीने म्हटले आहे की ZyCoV-D च्या मानवी चाचणीला सुरूवात झाली आहे. या मल्टि सेंट्रीक स्टडीमध्ये लशीची सुरक्षा, सहनशीलता (रोग प्रतिकारशक्ती) आणि इम्युनोजेनिसिटीचे (प्रतिरक्षाजनकता) मूल्यांकन केले जाईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या