JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / ब्राझीलमध्ये चिनी लशीविरोधात एल्गार; 300 नागरिक उतरले रस्त्यावर

ब्राझीलमध्ये चिनी लशीविरोधात एल्गार; 300 नागरिक उतरले रस्त्यावर

ब्राझीलमध्ये चिनी लशीविरोधात नागरिकांनी आंदोलन केलं आहे. साओ पावलोच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 नोव्हेंबर: संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे. अशातच कोरोनावर लस (Corona Vaccine) कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण ज्या चीनमधून कोरोना व्हायरस(Corona Virus)चा प्रसार झाला त्या चीनविरोधातही सगळ्यांच्याच मनात असंतोषाचं वातावरण आहे. सिनोव्हॅक ही चायनीज कंपनी कोरोनावर लस बनवत आहे. ब्राझीलमध्ये सिनोव्हॅक ही औषध कंपनी तिसऱ्या टप्प्याची मानवी लस चाचणी करत आहे. ही लस बंधनकारक करण्याचा विचार ब्राझीलमधील साओ पावलोच्या राज्यपालांचा आहे. याविरोधात ब्राझीलच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. सिनोव्हॅक लस बंधनकारक करण्याचा विचार राज्यपालांचा आहे. एवढंच नाही तर चीनकडून 60 लाख लशी विकत घेणार असल्याचा मानस त्यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. एकीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्या म्हणण्यानुसार चीनची लस ऐच्छिक आहे. तर दुसरीकडे राज्यपाल लशीची सक्ती करणार आहेत असं दिसत आहे. त्यामुळे संतापलेल्या ब्राझीलच्या नागरिकांनी चिनी लस आणि राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ 300 नागरिकांनी रविवारी आंदोलन केलं. दरम्यान भारत बायोटेक कंपनीतील अधिकाऱ्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे. नुकतीच भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं समोर येत आहे. कोरोना लशीसंदर्भात सध्या वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. काही जण कोरोना लशीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. कोरोनावर लस आली तर ती टोचून घेणार नाही असं काही जणांचं मत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या