पावसळ्यातही बाहेर जाताना मास्क लावावा. बाहेर जाताना एक्सट्रा मास्क बरोबर ठेवा. पावसामुळे मास्क ओला किंवा दमट झाल्यास लगेच बदलावा. चेहरा आणि हात पुसण्यासाठी टीश्यूपेपरचा वापर करावा.
गुवाहाटी, 5 एप्रिल: देशभरात वेगानं वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या (Covid-19) हा काळजीचा विषय आहे. गेल्या 24 तासांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आजवरचा एक मोठा रेकॉर्ड आहे. या गंभीर परिस्थितीमध्येही काही नेत्यांना याचं गांभीर्य दिसत नाही. आसामचे आरोग्य मंत्री हिमांत बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) यानी कोरोनाबाबत एक अजब विधान केलं आहे. ‘कुणालाही मास्क वापरण्याची गरज नाही. (no need to wear mask) कोरोना आता गेला आहे. मास्क लावला तर ब्युटी पार्लरचा धंदा चालणार नाही,’ असा अजब दावा सर्मा यांनी ‘इंडिया टुडे’ ग्रुपला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल (Viral) होत आहे. काय म्हणाले सर्मा? या मुलाखतीच्या वेळी कोरोनावर विचारलेल्या प्रश्नावर सर्मा यांनी दिलेल्या उत्तरानं सर्व जण आवाक झाले आहेत. ‘मास्क घालण्याची गरज काय? याबाबत लोकांमध्ये भीती कशाला निर्माण करता?,’ असा प्रश्न सर्मा यांनी विचारला. सर्मा एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘मास्क घातला तर ब्युटी पार्लर कसे चालतील? ब्युटी पार्लर चालण्याची देखील गरज आहे. ज्या दिवशी कोरोनाचा धोका वाढला आहे, असे मला वाटेल त्या दिवशी मी लोकांना मास्क वापरण्याची सूचना करेल. सध्या आसाममध्ये कोरोना नाही.’ असा दावा सर्मा यांनी केला.
हिमंता बिस्वा सर्मा या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. अनेकांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. तर काही जण त्यांचे मास्क न घालण्याचा आदेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत आहेत.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय सभांना मोठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या धोक्याचा कोणताही परिणाम या गर्दीवर झाला नाही.