JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / कोरोना लशीवरील टॅक्स कायम; तुम्हाला किती बसणार फटका?

कोरोना लशीवरील टॅक्स कायम; तुम्हाला किती बसणार फटका?

कोरोना लशीवरील जीएसटी कायम ठेवल्याने सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार?

0110

कोरोना लशीवरील कराबाबत केंद्र सरकारने आपला निर्णय जारी केला आहे. लशीवरील 5 टक्के जीएसटी केंद्र सरकारने कायम ठेवला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही.

जाहिरात
0210

18+ सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात लस दिली जाते आहे. सरकारी रुग्णलयात मोफत तर खासगी रुग्णालयात पैसे आकारून लस दिली जाते आहे.

जाहिरात
0310

21 जूनपासून केंद्र सरकारमार्फत 18+ सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. पण ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल.

जाहिरात
0410

खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लशीची मूळ किंमत, कोरोना लशींवरील कर आणि सर्व्हिस चार्ज एकत्रित करून सरकारने एक कमाल दर निश्चित करून दिला आहे. या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकाराल्यास खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.

जाहिरात
0510

देशातील लस उत्पादनाच्या 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. पण इथल्या लसीकरणावर राज्य सरकारचं लक्ष असेल.

जाहिरात
0610

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस प्रति डोस 780 रुपयांना असेल (लशीची मूळ किंमत 600 रुपये + 5% GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0710

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन प्रति डोस  1410 रुपये असेल (लशीची मूळ किंमत 1200 रुपये + 60 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0810

रशियाची स्पुतनिक-V प्रति डोस 1145 रुपये (लशीची मूळ किंमत 948 रुपये + 47 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0910

खासगी रुग्णालयांना 25 टक्के लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. तर केंद्र सरकारमार्फत 75 टक्के लसीकरण केलं जाणार आहे.

जाहिरात
1010

21 जूनपासून 18+ सर्वांना केंद्र सरकारमार्फत सर्वांना कोरोना लस मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना लशीवरील टॅक्स कायम ठेवला सरकारी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना थेट फटका बसणार नाही. कारण 75  टक्के लस सरकार खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटीही भरत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या