मुंबई, 16 जुलै: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) आज 16 जुलैला जाहीर होण्याची घोषण केली. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली. या वर्षीचा निकाल परीक्षेशिवाय विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी किती गुण मिळणार या चिंतेत आहेत. त्यात सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे. त्यामुळे या वर्षीचा निकाल नेहमींपेक्षा चार टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नेहमीप्रमाणेच यंदाही अनेक विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. तर शेकडो विद्यार्थ्यांना 100% मिळाले आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. नक्की किती विद्दयार्थ्यांना कोणत्या श्रेणीत गुण मिळाले आहेत ते जाणून घेऊया. हे वाचा - Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य प्राविण्यासह प्रथम श्रेणीतील विद्यार्थी - 6,48,683 प्रथम श्रेणीतील विद्यार्थी - 6,98,885 द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी - 2,18,070 उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी - 9356 इतकंच नाही तर राज्यात चक्क 100% गुण मिळालेले एकूण 957 विद्यार्थी आहेत. तर 83 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गन मिळाले आहेत. त्यामुळे यंदाचा निकाल सर्वोत्तम असल्याची माहिती मिळतेय.