महाराष्ट्रातील एका अतिदुर्गम गावात भाषेची अडचण असताना या शिक्षकाने वेगवेगळ्या उपक्रमातून येथील मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
राज्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम अशा (गडचिरोली) आसरल्लीच्या खुर्शिद शेख या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
आसरल्ली तेलंगणाच्या सीमेवरील अतिदुर्गम गाव असून भाषेची अडचण असताना अशा गावात खुर्शिद शेख यांनी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये शिक्षण विज्ञानाची भाषेची आवड निर्माण केली.
त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे 45 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 200 वर पोहोचली.
मुंबई पासून 1 हजार किलोमीटर अंतरावर आसरल्ली हे गाव आहे, तेथे या शिक्षकाने मोठं काम करून दाखवलं आहे.