JOIN US
मराठी बातम्या / करिअर / इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय? मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क

इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय? मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क

ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती 8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जून : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (Power grid Corporation of India Limited) (PGCIL) डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.PGCI 2021 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांतील संप्रेषण प्रणाली-II साठी केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती  8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे. या पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना कम्प्युटर बेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट २ तासांची राहणार आहे. तसंच यात लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते. या आहेत जागा यात एकूण 20 रिक्त जागा असून त्यातील 15 जागा डिप्लोमा ट्रेनी (Electrical) आणि उर्वरित 5 UG ट्रेनी (CIVIL) साठी आहेत. प्रशिक्षण कालावधीच्या वेळी उमेदवारास दरमहा 27,500 रुपयांचं वेतन मिळणार आहे. हे वाचा - Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक 70% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत पूर्णवेळ नियमित तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अपंगत्व असलेले उमेदवार पास गुणांसह पदासाठी अर्ज करू शकतात. अशी असेल परीक्षा परीक्षेचा भाग -1 – टेक्निकल टेस्ट आणि व्यावसायिक ज्ञान चाचणीवर आधारित असेल. यात संबंधित विषयातील 120 प्रश्न असतील. पेपरचा भाग २ – एप्टीट्यूड टेस्ट असेल. या वेबसाईटला द्या भेट पॉवरग्रीड डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरती 2021 मध्ये इच्छुकांनी www.powergrid.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या