JOIN US
मराठी बातम्या / करिअर / News18 Network ने BYJU’S Young Genius Season 2 सह सुरू केलाय भारतातील प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असलेल्या आणखी एका मुलाचा शोध

News18 Network ने BYJU’S Young Genius Season 2 सह सुरू केलाय भारतातील प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असलेल्या आणखी एका मुलाचा शोध

भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क/News Network Network18 ने BYJU च्या यंग जीनियससोबत (Young Genius) नेमके हेच साध्य करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी भविष्यात अलौकिक बुद्धिमत्तापूर्ण व्यक्ती बनण्याची क्षमता असलेल्या तरुण प्रतिभावंतांना शोधणे आणि त्यांचा सत्कार करणे हे एक निरंतर मिशन आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधीतरी असा एक क्षण आलेला असतो ज्यावेळी आपण अगदी मनापासून एखाद्या विषयात किंवा कलागुणामध्ये पारंगत असावे अशी तीव्र इच्छा व्यक्त केलेली असते. प्रतिभासंपन्न बुद्धिमत्ता असणे हे दैनंदिन जीवनात निश्चितच सोयीस्कर असू शकते. प्रतिभासंपन्न बुद्धिमत्ता अथक प्रयत्नांनी घडवली जाते ती उपजतच जन्माला आलेली असतेच असे नाही परंतु आपण अनेकदा  या वस्तुस्थितीकडे पाहण्यात गफलत करतो. आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे टीव्हीवरील सादरीकरण पाहत असताना, आपण त्यांची त्यांच्या कलेविषयीची अत्याधिक उत्कट आवड, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची अद्वितीय कला, तसेच त्यांनी प्रतिभासंपन्न बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळविण्यापूर्वी केलेला असंख्य तासांचा सराव यागोष्टी पाहू शकत नाही. तर तुमच्या मते प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असलेले मुल म्हणजे काय? ते बुद्धिमान, निरंतर प्रेरित, अत्यंत जिज्ञासू, कल्पक, तसेच ते कोणतीही जोखीम घेण्यास घाबरत नाही असे आहे. आपण मागील आठवड्याच्या शेवटी संपलेल्या Tokyo Olympics मध्ये बिकट पार्श्वभूमीतून आलेल्या अत्यंत हुशार देशबांधवांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची मालिका पाहिली. पुरुषांच्या भालाफेकीमध्ये आश्चर्यकारकरित्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या नीरज चोप्राची याविषयीची आकांक्षा हरियाणातील एका छोट्या गावात निर्माण झाली होती.आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या सोईसुविधा अशा अवघड परिस्थितीवर मात करून, तो ऑलिम्पिकमध्ये (Olympics) भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक बनला आहे. आपल्याकडे अगदीच खालच्या स्तरातील विविध क्षेत्रांमधील अशा कुशाग्र तरुण प्रतिभावंतांना शोधण्यासाठी, तसेच त्यांच्या कलेला जोपासण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिभेला सार्वजनिक व्यासपीठावर सादर करण्याकरिता संसाधने उपलब्ध असतील तर जगाला त्याचा निःसंशयपणे खूप फायदा होईल. भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क/News Network Network18 ने BYJU च्या यंग जीनियससोबत (Young Genius) नेमके हेच साध्य करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी भविष्यात अलौकिक बुद्धिमत्तापूर्ण व्यक्ती बनण्याची क्षमता असलेल्या तरुण प्रतिभावंतांना शोधणे आणि त्यांचा सत्कार करणे हे एक निरंतर मिशन आहे. आपण Season 1 मध्ये चॅनेलवर कौशल्य सादर करणाऱ्या यंग अचिवर्सना (प्रतिभासंपन्न मुलांना) पाहिले आहे   ज्यांची निवड News18 चे संपादक आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या पॅनेलच्या माध्यमातून झाली होती. हे सर्व काही प्रतिभाशाली मुलांपासून सुरू झाले जसे की लिडियन नाधस्वरम (15) ज्याने डोळ्यावर पट्टी बांधून 190 बीट प्रति मिनिट वेगाने पियानो वाजवून लोकांना चकित केले आहे आणि मेघाली मलाबिका (14) तिच्या अफाट बुद्ध्यांकामुळे गूगल गर्ल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे. मेन्सा सोसायटीचा सदस्य, अनेक अॅप्सचा विकासक आणि एका पुस्तकाचा लेखक असलेल्या ऋषि शिव पी (6) चा अविश्वसनीय असा 180 बुद्ध्यांक आहे! अवंतिका कांबळी (10) ही 6 अंकी वर्गमूळाच्या वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे तर तिलुक कीसम (13) हा बारच्या खाली सर्वात लांब लिम्बो स्केटिंग साठी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर आहे.शाळा आणि कॅम्पसमध्ये जागरूकता पसरवण्याच्या आणि गुंडगिरी कमी करण्याच्या उद्देशाने, अनुष्का जॉली (12) ही Anti-bullying Squad (ABS) नावाचे वेब प्लॅटफॉर्म तयार करून सामाजिक उद्योजक बनली आहे. ही अजोड बुद्धीमत्तासंपन्न मुले भारतातील अनेक मुलांसाठी प्रेरणास्थान बनली आहेत, सोशल प्लेटफॉर्मवर 98.4% सकारात्मक प्रतिक्रिया आणि देशभरातील प्रेक्षकांकडून नवीन भागांची सातत्यपूर्ण मागणी केली जात आहे. पहिल्या सीजनच्या प्रचंड यशासह, News18 Network यंग जीनियसच्या (Young Genius) दुसऱ्या आवृत्तीसह परत आले आहे जे मुलांच्या प्रतिभासंपन्नतेच्या विलक्षण गोष्टी सादर करण्यासाठी वचनबद्ध आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे: हा कार्यक्रम Network18 चे वरिष्ठ संपादक आणि अँकर आनंद नरसिम्हन यांनी होस्ट केला असून, तो जानेवारी 2022 मध्ये सुरू होईल आणि त्यामध्ये 11 भागांचा समावेश असेल, ज्यात परफॉर्मिंग आर्ट्स, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवसाय, क्रीडा आणि अधिक यासारख्या विविध क्षेत्रांमधील 6 ते 15 वयोगटातील सुमारे 20 तरुण प्रतिभाशाली मुलांचा सन्मान केला जाईल. प्रत्येक भाग रोमांचक अनुभूती देणारा असेल कारण या तरुण प्रतिभावंतांना उत्साहित करण्यासाठी काही नामांकित भारतीय व्यक्तींना सामील केले जाईल जे मुलांच्या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या या स्थानापर्यंत पोहोचण्याच्या रोचक मार्गाची सफर देखील घडवतील. तुम्हाला यामध्ये स्वारस्य असल्यास, https://www.news18.com/younggenius/ ला भेट द्या आणि नोंदणी फॉर्म भरा. या प्रारंभिक सबमिशननंतर मल्टी-स्टेज मूल्यांकनाच्या प्रक्रियेकरिता मुलाचे प्रत्येक तपशील प्राप्त करण्यासाठी सविस्तर फॉर्म भरावा लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही BYJU चे अॅप डाउनलोड करू शकता आणि BYJU च्या यंग जीनियस (Young Genius) विभागात नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या मुलामधील प्रतिभा कशी शोधायची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्यांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करण्याची आणि त्यामध्ये निष्णात होण्यासाठी प्रयत्न करण्याची परवानगी देणे हे त्यामागील गमक आहे.   हा अद्वितीय प्लॅटफॉर्म काही हुशार तरुण प्रतिभासंपन्न मुलांची जगाला ओळख करून देण्यासाठी तसेच भावी पिढीला मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित करण्याकरिता आणि त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट यश प्राप्त करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी सज्ज आहे. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व लपलेले असते, देशातील अशा कल्पक तरुणांमधील प्रतिभा जगासमोर आणण्याची सुवर्ण संधी News 18 Network आपणास उपलब्ध करून देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या