MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर करेल. निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील.