नागपूर, 23 जून : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) या ठिकाणी मेट्रोचं (Maha Metro) काम वेगानं सुरु आहे. त्यात नागपूर आणि मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro Rail) काही प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. म्हणूनच आता नागपुरातील महा मेट्रोमध्ये पदभरती होणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Metro Nagpur Bharti 2021), नागपूर इथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी एकूण 18 जागांवर पदभरती होणार आहे. या जागा आहे रिक्त व्यवस्थापक (Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) हे वाचा - बारावीनंतर कॉमर्समध्ये करिअर करायचंय? मग हे कोर्सेस करा आणि मिळवा भरपूर पगार वयोमर्यादा व्यवस्थापक (Manager) - 40 वर्षे सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) - 35 वर्षे शैक्षणिक पात्रता व्यवस्थापक (Manager) - BE (Electronics or Electronics and Telecommunication) सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) - BE (Electronics or Electronics and Telecommunication) अर्ज पाठवण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 आहे. सविस्तर नोटिफिकेशन बघण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा