मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीनंतर आता दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Result 2023) केला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही घसरला आहे. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला. गेल्यावर्षी हा निकाल 96.94 टक्के इतका होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात 3.11 टक्के घसरण झाली आहे. तर मुलींनी निकालात बाजी मारली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या निकालामध्ये लातूर पॅटर्नचा बोलबाला पाहण्यास मिळाला. दहावीचा निकाल तुम्ही सर्वात वेगवान निकाल News18 Lokmat वर पाहू शकता.
– कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल
– सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.67 टक्के निकाल
– लातूर पॅटर्न पुन्हा एकदा ठरला अव्वल, 108 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के
– राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151