JOIN US
मराठी बातम्या / करिअर / CBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी? 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण

CBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी? 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण

आता विद्यार्थी आणि पालकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै: राज्यात दहावीचा निकाल (SSC Result 2021) लागल्यानंतर आता CBSE चा दहावी आणी बारावीचा (CBSE 10th Result 2021) निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सर्वात आधी जाहीर होणारा CBSE दहावी आणि बारावीचा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) यंदा कोरोनामुळे उशिरा जाहीर होत आहे. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोरोनामुळे या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. अशातच निकाल लावणार तरी कसा असा प्रश्न बोर्डासमोर होता. अखेर विशेष मूल्यांकन पद्धतीनं निकाल लावण्यात येणार असं ठरलं. त्यानुसार CBSE दहावीचा निकाल 25 जुलैच्या आतमध्ये तर बारावीचा निकाल 31 जुलैच्या आत लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. नेमका उशीर कशामुळे? शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकालासंबंधी (CBSE 12th Result) उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी 22 जुलै हे तारीख दिली होती. मात्र ही तारीख वाढवून 25 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजतापर्यंत करण्यात आली होती त्यामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होतो आहे. तसंच दहावीचा निकाल लवकर जाहीर होणार अशी आशा होती मात्र काही विद्यार्थ्यांचा डेटा मिळवण्यात शाळांना अडचणी येत असल्यामुळे दहावीचा निकालही उशिरा जाहीर होणार आहे. हे वाचा - MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल आता कधी लागणार निकाल निकालाच्या तारखांबाबत CBSE बोर्डाकडून अजूनही अधिकृतरित्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.. मात्र दहावीचा निकाल (CBSE 10th Result date) जुलैच्या शेवट्पर्यंत तर बारावीचा निकाल (CBSE 12th Result) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये ही खबरदारी CBSE घेत आहे. या वेबसाईटवर बघता येणार निकाल CBSE दहावीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला दहावीचा निकाल बघू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर एंटर करावा लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या