JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, 18 विद्यार्थ्यांना रँक 1, महाराष्ट्राचा अर्थव तांबटही अव्वल

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, 18 विद्यार्थ्यांना रँक 1, महाराष्ट्राचा अर्थव तांबटही अव्वल

JEE Main Result 2021: जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जाहिरात

Representative Image

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर (JEE Main 2021 result announced) करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर 1 रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट (Atharva Abhijeet Tambat) या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली. रँक 1 मिळवणारे 18 विद्यार्थी जेईई मेन 2021 च्या परीक्षेत 18 उमेदवारांनी रँक 1 मिळवला आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील चार, राजस्थानमधील तीन, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि तेलंगणातील दोन विद्यार्थी तर बिहार, कर्नाटक, पंजाब, चंडीगढ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. रँक 1 मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे

असा तपासा जेईई मेन 2021 चा निकाल सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर लॉगिन करा जेईई मेन 2021 रिजल्ट या लिंकवर क्लिक करा यानंतर परीक्षेच्या संदर्भातील विचारलेली माहितीची नोंद करा यानंतर तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकतात. यंदाच्या वर्षापासून संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन वर्षभरात चारवेळा आयोजित करण्यात येत आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या स्कोअरमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात दुसरा मार्च महिन्यात तिसरा एप्रिल आणि त्यानंतर मे हमिन्यात परीक्षा होणार होत्या मात्र, कोविड19 च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्या स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 20 ते 25 जुलै दरम्यान घेण्यात आल्या होत्या तर चौथ्या टप्प्यातील परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या