JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / करिअर / रेल्वेत मेगा भरती, दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेत मेगा भरती, दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेच्या विविध विभागात अनेक पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये शिकाऊ ते ज्युनिअर इंजीनिअर या पदांसाठी भरती होणार आहे.

0105

रेल्वेच्या विविध विभागात अनेक पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये शिकाऊ ते ज्युनिअर इंजीनिअर या पदांसाठी भरती होणार आहे. जर तुम्हीही यासाठी अर्ज करणार असाल तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.

जाहिरात
0205

दक्षिण-पश्चिम रेल्वने 963 आंतरवासितेच्या (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी 15 ते 24 वर्ष वय असलेल्या 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तसेच उमेदवाराने आयटीआयचं शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. या पदासाठी 16 जानेवारीपर्यंत swr.indianrailways.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.

जाहिरात
0305

पश्चिम रेल्वेने अॅप्रेंटिसच्या 3 हजार 553 इतक्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीही वयाची अट 15 ते 24 वर्ष अशी आहे. या नोकरीसाठी 10 वी आणि आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 9 जानेवारीपर्यंत आहे. रेल्वेच्या wr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतात.

जाहिरात
0405

पूर्व- मध्य रेल्वेतही 2 हजार 234 पदांसाठी भरती होणार आहे. या पदासाठी rrcecr.gov.in या वेबसाइटवर अर्ज करता येतात. 15 ते 24 वय असलेल्या 10 वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतील.

जाहिरात
0505

रेल्वेच्या सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या 798 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी वयाची मर्यादा 18 ते 25 वर्ष इतकी आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. रेल्वेच्या rpfonlinereg.co.in या वेबसाइटवरुन अर्ज करु शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या