JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Government Job Alert: CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती, एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे सॅलरी

Government Job Alert: CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती, एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे सॅलरी

CRPF साठी काम करायची संधी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै आहे. वाचा तपशील..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जून: सेंट्रल रिझर्व पोलीस दलाने (central reserve police force) सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 30 जूनपासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै आहे. सहाय्यक कमांडंटची (Assistant commandant CRPF vacancy) रिक्त जागा सिव्हिल इंजिनिअर पदासाठी आहे. या पदांसाठी एकूण 25 जागा रिक्त आहेत. यामध्ये 10 टक्के रिक्त जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांची निवड शारीरिक मानक चाचणी (physical standard test),  शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test), लेखी परीक्षा (written test), कागदपत्र पडताळणी (document verification) व तपशीलवार वैद्यकीय चाचणी (detail medical test) व मुलाखत (interview) नंतर होईल. रिक्त जागांबद्दल तपशीलवार माहिती - असिस्टंट कमांडंट (सिव्हिल इंजीनिअर)- एकूण पदे - 25 आरक्षित नसलेली पदे (13), इडब्लूएस (02), ओबीसी (06), एससी (03), एसटी (1) असिस्टंट कमांडंटचे पगार - लेव्हल- 10 (56100-177500) किमान शैक्षणिक पात्रता- सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवीधर पदवी. वय मर्यादा - कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज फी- 400 रुपये. एससी / एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. शारीरिक प्रमाण (Physical Standard) पुरुष उमेदवारांची उंची - 165 सेंटीमीटर महिला उमेदवारांची उंची - 157 सेंटीमीटर भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार; रक्कम वाचून तुम्हीही व्हाल थक्क पुरुषाची छाती - 81 सेंटीमीटर (न फुगवता, फुगवल्यानंतर 86 सेंटीमीटर) पुरुष उमेदवाराचे वजन- कमीत कमी 50 किलोग्राम महिला उमेदवाराचे वजन- उंचीनुसार अर्ज कसा करणार - असिस्टंट कमांडंट पदासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावे लागतील. अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून फोटोकॉपीसह तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. लिफाफ्यावर ‘केंद्रीय रिझ पोलीस दल असिस्टंट कमांडंट (इंजीनिअर/सिव्हिल) परीक्षा- 2021’ लिहायला विसरू नका.

नोकरीची सर्वात मोठी संधी! MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार पदभरती; वाचा सविस्तर

संबंधित बातम्या

अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे- डीआयजी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ रामपूर, जिल्हा रामपूर, यूपी -244901

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल आणि तुमची शैक्षणिक पात्रता या पदासाठी योग्य असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. एकूण 25 पदं रिक्त असून 56 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत वेतन या पदांसाठी दिलं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या