मुंबई, 18 ऑगस्ट: सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department Mumbai) इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सेवा हक्क आयुक्त या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती राज्य सेवा हक्क आयुक्त ( State Commissioner for Right to Service in Konkan Division) अनुभव राज्य सेवा हक्क आयुक्त ( State Commissioner for Right to Service in Konkan Division) - सरकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरणातील प्रशासनातील ज्ञान आणि अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित व्यक्ती. अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि ई-मेल आयडी सचिव (A.R. O & M) सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 / rts.mumcomm-mh@gov.in सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.