या संबंधात लोकसभेत आज प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावर उत्तर दिलं.
नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : कोरोना महामारीमुळे कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसला. पण आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षामध्ये भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी 7.7 टक्क्याने वाढ (Salary Hike in 2021) करणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 60 टक्के वाढ होऊ शकते. Aon नावाच्या एका कंपनीने पगार वाढीसंदर्भात सर्वेक्षण (Aon Survey Report) केले होते. मंगळवारी या कंपनीने आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात असे म्हटले आहे की, जपान, अमेरिका, चीन, सिंगापूर, जर्मनी आणि युके या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जास्त वाढ करणार आहे. या देशातील कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारात 3.1 ते 5.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये देखील भारतीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 6.4 टक्क्यांनी वाढ केली होती. सेक्टर्सनुसार पाहिले तर ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सर्वात चांगली 10.1 टक्क्यांपर्यंत पगार वाढ मिळेल. त्यापाठोपाठ टेक कंपन्यांमध्ये 9.7 टक्के, आयटी कंपन्यांमध्ये 8.8 टक्के, एंटरटेमेंट आणि गेमिंग कंपन्यांमध्ये 8.1 टक्के पगारवाढ मिळेल. या वर्षी केमिकल आणि फार्मा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 8 टक्के पगारवाढ देऊ शकतात. या सर्वेक्षणासाठी जवळपास 1200 कॉर्पोरेट हाऊसेसमधून माहिती गोळा करण्यात आली होती. सर्वेक्षण अहवालात असे सुद्धा म्हटले आहे की, व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.9 टक्के वाढ होऊ शकते. तर, वित्तीय संस्था यावर्षी आपल्या कर्मचार्यांच्या पगारामध्ये 6.5 टक्क्यांनी वाढ करू शकतात. या सेक्टरमध्ये होणार सर्वात कमी पगारवाढ - दरम्यान, असे अनेक सेक्टर्स आहेत ज्याला कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त फटका बसला आहे. या सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात 5.5 ते 5.8 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या सेक्टर्समध्ये हॉस्पिटेबिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, रिटेल आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा समावेश आहे. या वर्षी अनेक कंपन्यांची स्थिती चांगली - या सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले की, 93.5 टक्के संस्थांना यावर्षी सकारात्मक व्यवसाय करणे अपेक्षित आहे आणि ते आपल्या कर्मचार्यांचे पगार वाढवण्याच्या स्थितीत असतील. अशामध्ये, इतर 6.5 टक्के संस्थांचा असा अंदाज आहे की, यावर्षी त्यांचा व्यवसाय चांगला कामगिरी करणार नाही आणि कर्मचार्यांचा सरासरी पगार वाढवून त्यांना टिकवून ठेवणे आव्हान असेल. जवळपास 60 टक्के संस्थांचा असा विश्वास आहे की, त्यांची स्थिती सुधारत आहे आणि 2021 मध्ये ते आपल्या कर्मचार्यांना पगारात 9.1 टक्के वाढ देऊ शकतात. रोजगाराच्या संधी वाढतील - या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, आर्थिक स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे जवळपास सर्व प्रमुख सेक्टर्समधील व्यावसायिकांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. यावर्षी ते चांगली कामगिरी करतील. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतील.