नवी दिल्ली, 23 जुलै: Indian School Certificate Examinations अर्थातच ISCE आणि ISC बोर्डाचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या 24 जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल लावला जाणार असल्याची अधिकृत माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. cisce.org आणि result.cisce.org या दोन संकेतस्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डानं ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्याच्या कोणत्याही परीक्षा न घेता निकाल लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर हा निकाल लावला जाणार आहे.
असा पाहा निकाल… 1: विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org या संकेतस्थळाला भेट द्यावी 2: वेबसाइटवर दिलेल्या RESULT च्या लिंकवर क्लिक करावं. 3: याठिकाणी रोल नंबर आणि अन्य माहिती सबमिट करावी. 4: अचूक माहिती टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर निकाल दिसेल. 5: निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंट घ्यावी, नंतर उपयोगात येऊ शकते.