JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / करिअर / Career Tips: 'या' देशांमध्ये नोकरी मिळाली तर चान्स सोडू नका; मिळेल भरघोस पगार आणि सुविधा

Career Tips: 'या' देशांमध्ये नोकरी मिळाली तर चान्स सोडू नका; मिळेल भरघोस पगार आणि सुविधा

आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरीही मिळू शकते. जाणून घ्या कोणत्या देशांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळू शकतात.

0106

परदेशात स्थायिक होऊ इच्छिणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. यासाठी ते खूप मेहनत घेतात आणि त्यांना उत्तम करिअर पर्याय मिळताच ते परदेशात नोकरीसाठी अर्ज करतात (). आपल्याला परदेशात नोकरी करण्याची इच्छा असते. परदेशातील बाजारपेठेवर योग्य पकड असेल तर तेथे नोकरी करून अनेक फायदे (परदेशातील नोकऱ्या) मिळू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला फक्त नकरीच नाही तर चांगल्या पॅकेजची नोकरीही मिळू शकते. जाणून घ्या कोणत्या देशांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळू शकतात.

जाहिरात
0206

अमेरिका (America): अमेरिकेत नोकरदार लोकांना पगाराच्या नावावर चांगली रक्कम दिली जाते (Jobs In America). सर्वाधिक पगार देण्याच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 31.6 टक्के टॅक्स भरल्यानंतरही एका व्यक्तीला वार्षिक 41,355 डॉलर पगार मिळतो.

जाहिरात
0306

लक्झेंबर्ग (Luxembourg) : सर्वाधिक पगार देण्याच्या बाबतीत, लक्झेंबर्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे (Jobs in Luxembourg). हा देश युरोपचे आर्थिक केंद्र मानला जातो. लक्झेंबर्गमध्ये, पगारातून 37.7 टक्के कर कापूनही, प्रत्येक व्यक्तीला वार्षिक 38,951 युरो मिळतात.

जाहिरात
0406

नॉर्वे (Norway): नॉर्वेमध्ये कर्मचाऱ्यांना चांगला पगारही दिला जातो. नॉर्वेमध्ये भरपूर नैसर्गिक संसाधने (Jobs in Norway) आहेत. येथे, पगारातून 37 टक्के कर कापूनही, सरासरी पगार वार्षिक $ 33,492 आहे.

जाहिरात
0506

स्वित्झर्लंडमध्ये, प्रत्येक व्यक्तीला वार्षिक सरासरी $ 33,491 पगार मिळतो. एवढेच नाही तर आठवड्यात जास्तीत जास्त 35 तास काम करावे लागते.

जाहिरात
0606

ऑस्ट्रेलियात आठवड्यात फक्त ३६ तास काम करावे लागते. त्या बदल्यात, 27 टक्के कर कापूनही, तुम्हाला वार्षिक $31,588 पगार म्हणून मिळतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या