अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, ०4 ऑगस्ट: नुकताच राज्याचा बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे बारावीनंतरच्या विविध शाखांमधील प्रवेशाची (Admissions after 12th class). हे प्रवेश कधीपासून सुरु होणार, यंदा या प्रवेशासाठी नेमकं काय करावं लागणार? याबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासाही देण्यात आला आहे. बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी साधारणतः CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्कांवरच कॉमर्स , सायन्स (Science) आणि आर्टस्मध्ये (Arts) प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. दरवर्षीच्या बारावीच्या निकालापेक्षा यंदा बारावीचा निकाल तब्बल नऊ टक्के जास्त लागला आहे त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठं वाढ झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कॉलेजमध्ये तुकड्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. विविध अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम याकरता प्रदेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र CET देणं अनिवार्य असणार आहे. अशा विद्यार्थ्यांमसाठी CET घेण्यात येणार आहे. यासाठी CET परीक्षेच्या केंद्रांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. साधारणतः 350-400 केंद्रं यासाठी असणार आहेत. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कोविडची स्थिती बघून पुढचं शैक्षणिक वर्ष-फिजीकली सुरू करणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असंही त्यांनी म्हंटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होतपर्यंत त्यांना संपूर्ण शुल्क माफ असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागणार नाही अशी माहिती च्च आणि तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी दिली आहे.