मुंबई, 20 ऑक्टोबर : प्लॅस्टिकचं विघटन होण्यास बरीच वर्षं लागतात. त्यामुळे प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यासाठी सरकारदेखील प्रयत्न करत आहे. अनेक मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून त्याच्यापासून अनेक प्रॉडक्ट्स तयार करतात. कचऱ्यातील प्लॅस्टिकपासून रस्ते बनवल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण कार निर्मितीसाठी या प्लॅस्टिकचा वापर करण्यात आलाय, असं आम्ही तुम्हाला सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. पण हे पूर्णपणे खरं आहे. कचऱ्यातील प्लॅस्टिकचा वापर करून इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार करण्यात आली आहे आणि ती लवकरच बाजारात लाँच केली जाणार आहे. व्होल्वो कंपनी 9 नोव्हेंबर रोजी आपली नवीन इलेक्ट्रिक SUV EX90 लाँच करण्यासाठी पूर्णपणे झाली सज्ज आहे. या नव्या एसयूव्हीची खास गोष्ट म्हणजे तिला तयार करण्यासाठी सस्टेनेबल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Volvo EX90 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 50 किलो रिसायकल केलेलं प्लॅस्टिक आणि बायो बेस्ड मटेरियल वापरण्यात आलं आहे. एसयूव्हीच्या केबिनचे बरेच एलिमेंट्स या प्रकारच्या मटेरियलपासून बनवण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यात कार बुडाली? कसा करायचा इंश्युरन्सचा क्लेम; वाचा संपूर्ण प्रक्रिया EX90 इलेक्ट्रिक एसयूव्ही हा XC90 चा EV व्हेरियंट आहे, जी XC40 नंतर स्वीडिश ब्रँडचं दुसरे ICE मॉडेल म्हणून ऑल-इलेक्ट्रिक मॉडेलसह नवीन लूकमध्ये येईल. व्होल्वोच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लाइनअपमध्ये ते XC40 रिचार्ज आणि C40 रिचार्जला टक्कर देईल. कचऱ्यापासून इंटिरिअर केबिनची पहिली ऑफिशियल इमेज शेअर करताना, स्वीडिश लक्झरी कार निर्माता कंपनी व्होल्वोने खुलासा केला, की इलेक्ट्रिक SUV चं इंटिरिअर कचऱ्यातील प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनवलं आहे. तसंच यामध्ये वापरण्यात येणारे फेव्हरिक जंगलातून गोळा केलेल्या बायो-मटेरिअलपासून बनवण्यात आले आहेत. कंपनीने या एसयूव्हीमध्ये नॉर्डिको नावाचं एक नवीन मटेरियल वापरलं आहे, ज्याला रिसायकल मटेरियलपासून विकसित करण्यात आलं आहे. यात पाइन राळचा देखील समावेश आहे. कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; या इलेक्ट्रिक कारचा खर्च बाईकच्या तुलनेत काहीच नाही लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या केबिनबद्दल बोलताना व्होल्वोने सांगितलं, की ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फिगरेशन ऑफर करणार आहेत, जे कारचे इंटिरियर स्पेसिफिकेशन आणि बाह्य भागासह अपहोल्स्ट्री सिंक्रोनाइझ करतात. कारचं डिझाइन स्कॅन्डेनेव्हियन जीवनशैली आणि निसर्गापासून प्रेरित असल्याचा दावा केला जात आहे. स्कॅन्डेनेव्हिया हा उत्तर युरोपमध्ये असलेला एक बेटांचा समूह आहे, त्यामध्ये नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क या देशांचा समावेश होतो.