JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / फक्त आणखी एक दिवस अन् भारतात लॉन्च होणार नवीन महिंद्रा Scorpio; सनरूफसह अनेक फिचर्स

फक्त आणखी एक दिवस अन् भारतात लॉन्च होणार नवीन महिंद्रा Scorpio; सनरूफसह अनेक फिचर्स

Mahindra Scorpio N: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील तमाम कारप्रेमी ज्या एसयूव्हीची वाट पाहत आहेत, अशी भारतीय कार विश्वातील सर्वात प्रसिद्ध एसयूव्हींपैकी एक असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ उद्या नव्या रुपात लॉन्च होणार आहे.

0108

देशभरातील कारप्रेमींचं लक्ष लागून राहिलेली महिंद्राची सुप्रसिद्ध एसयूव्ही (SUV) महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) उद्या नव्या रूपात लॉन्च होणार आहे.

जाहिरात
0208

कंपनीने नवीन स्कॉर्पिओला उत्कृष्ट लुक दिला असून अनेक उत्तम फिचर्स देखील दिली आहेत. कंपनी तिला 'बिग डॅडी ऑफ एसयूव्ही' (Big Daddy of SUVs)प्रमोट करत आहे. नवीन स्कॉर्पिओ 27 जून रोजी लॉन्च होणार आहे.

जाहिरात
0308

नवीन स्कॉर्पिओ कमांड सीट्ससह येईल. ही अशी आसने आहेत ज्यात बसण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होणार आहे. नवीन स्कॉर्पिओमध्ये मागील दरवाजा उघडणार नाही.

जाहिरात
0408

महिंद्रा फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पर्स (FSD), पेंटा-लिंक सस्पेंशन असेल. महिंद्रा स्कॉर्पिओ एन चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये तयार करण्यात आली आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे.

जाहिरात
0508

कंपनीने नवीन Scorpio-N मध्ये सनरूफ देखील दिले आहे. सनरूफसह येणारे हे स्कॉर्पिओ प्रकारातील हे पहिलेच वाहन असेल. कंपनीने याआधी कोणत्याही स्कॉर्पिओमध्ये सनरूफ दिलेले नाही. नवीन स्कॉर्पिओ महिंद्रा अँड महिंद्राच्या नवीन लोगोसह लॉन्च केली जाईल.

जाहिरात
0608

Mahindra Scorpio-N अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. यात प्रीमियम ड्युअल-टोन डॅशबोर्ड, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी सोनीची प्रीमियम साउंड सिस्टम मिळेल. तसेच, ही SUV 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येऊ शकते.

जाहिरात
0708

महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), मल्टिपल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखी उत्कृष्ट फिचर्स मिळतील.

जाहिरात
0808

27 जून रोजी येणारी, महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ MG Hector, Tata Safari, Hyundai Alcazar आणि Jeep Compass बरोबर स्पर्धा करेल. स्कॉर्पिओमध्ये एन 360-डिग्री व्ह्यू कॅमेरासह येईल. कंपनीची ही कार 6-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह येऊ शकते. कारमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय असेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या