JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / चार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातचं रिकामी; अकाऊंटमधून असे काढले जातायेत पैसे

चार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातचं रिकामी; अकाऊंटमधून असे काढले जातायेत पैसे

या एका चुकीमुळे अनेकांच्या बँकेतून लाखो रुपये काढण्यात आले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न****वी दिल्ली**, 25 सप्टेंबर** : सार्वजनिक ठिकाणी मोबाइल फोन चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं. या चुकीमुळे अनेकांच्या बँकेतून लाखो रुपये काढण्यात आले आहेत. सध्या जूस जॅकिंगच्या माध्यमातून लोकांना लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. जूस जॅकिंग हा एक प्रकारे सायबर अटॅक आहे. यात सार्वजनिक ठिकाणी उदा..एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा मॉल येथे वापरल्या जाणाऱ्या USB चार्जिंग पोर्टलच्या माध्यमातून कोणताही मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट वा दुसरं डिवाइसमध्ये मालवेयर इन्स्टॉल (juice jacking) करून पर्सनल डेटा चोरी केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादमधील एका कंपनीचे CEO कोणत्याही तरी सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाइल USB पोर्टच्या माध्यमातून चार्ज करीत होते. यानंतर त्यांच्या अकाउंटमधून 16 लाख रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. दिल्लीतही गेल्या महिन्यात एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एअरपोर्टवरील USB चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करीत असताना त्यांच्या खाच्यातून 1 लाख 20 हजार रुपये काढण्यात आले. यामुळे सरकारकडून लोकांना सावध केलं जात आहे. Private Photo Leak: तुमचे प्रायव्हेट फोटो अन् व्हिडीओ शेअर झालेत? या सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून करता येतील डिलीट सार्वजनिक ठिकाणावरील चार्जिक पोर्टचा वापर केल्यामुळे फोनवर सायबर हल्ला होता. हे काम दोन प्रकारे होतं. एक तर पॉवर केबल किंवा डेटा केबलने. अनेकदा लोक कॅफे, रेल्वे स्टेशन, मेट्रो, बस स्टँड वा एअरपोर्टवर रिकाना चार्जिंग पोर्ट दिसतास त्यावरुन मोबाइल चार्ज करतात. मोबाइल तर चार्ज होतो, मात्र याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या