JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Electric Car Range Tips: इलेक्ट्रिक कार आता केवळ शहरातील प्रवासासाठीच नव्हे तर महामार्गांवर जास्त अंतरावरील प्रवास करण्यासाठीदेखील एक चांगला पर्याय बनला आहे. इलेक्ट्रिक कारचा प्रवास हा परवडणारा तसेच आरामदायी असतो. कमी चार्जिंग स्टेशनमुळं अनेकवेळा समस्या येत असली तरी काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

जाहिरात

Electric Vehicle: इलेक्ट्रिक व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर: इलेक्ट्रिक वाहनांबद्दल एक गोष्ट सातत्यानं म्हटली जाते की त्या सिटी राइड कार आहेत, परंतु असं अजिबात नाही. आता बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारची रेंज चांगली आहे. लांबच्या राइड्स दरम्यान किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करताना चार्जिंगची समस्या उद्भवू शकते, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्यास या समस्या टाळता येऊ शकतात आणि तुम्ही या समस्येवर मात करू शकता. तसे आजकाल अनेक महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्याची सुविधा झाली आहे आणि सरकारही यासाठी सतत काम करत आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, सरकार विद्युत महामार्गाच्या प्रकल्पावर काम करत आहे. त्याच वेळी, रेस्टॉरंट आणि मोटेल ऑपरेटर्सनी मोठ्या शहरांमधील लोकांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर चार्जिंग पॉइंट देखील स्थापित केले आहेत. या गोष्टींची घ्या विशेष काळजी:

हेही  वाचा:  Flying Bike: जगातील पहिली उडणारी बाईक लाँच; वेग तब्बल 100 किमी/तास; काय आहे किंमत?

वॉलेट आणि UPI: ईव्ही चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी शुल्क आकारले जातात परंतु तेथे तुम्ही रोख किंवा कार्डद्वारे पेमेंट करू शकत नाही. ते पूर्णपणे UPI अॅप आणि ई-वॉलेटवर अवलंबून आहेत. यासाठी तुम्हाला नेहमी तुमच्या फोनमध्ये UPI अॅप किंवा ई-वॉलेट ठेवावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही पैसे देऊन तुमची कार सहज चार्ज करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या