JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / OnePlus ते Samsung 'हे' आहेत 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

OnePlus ते Samsung 'हे' आहेत 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

Best 5G Phone under 20,000 Rupees: सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तुमचं बजेट कमी असेल तरीही तुम्ही हे फोन खरेदी करू शकता.

0106

Best 5G Phone under 20,000 Rupees: भारतात गेल्या अनेक दिवसांपासून 5G तंत्रज्ञानाची चर्चा सुरु आहे. 5G तंत्रज्ञान भारतात आलं नसलं, तरी भारतीयांमध्ये 5G बाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. स्मार्टफोन कंपन्यांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तुमचं बजेट कमी असेल तरीही तुम्ही 5G फोन खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या पाच 5G स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. यामध्ये Realme, Samsung, OnePlus सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

जाहिरात
0206

OnePlus Nord CE 2 Lite 5G: वनप्लस नॉर्ड CE 2 Lite 5G मध्ये Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. त्यावर गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनदेखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर तसेच 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजसह येतो. या मोबाईलची किंमत 19,999 पासून सुरू होते.

जाहिरात
0306

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंग गॅलक्सी M33 5G मध्ये 6.6-इंचाचा TFT फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x2408 असून रिफ्रेशिंग रेट 120Hz असेल. फोनमध्ये Exynos 1280 octa-core SoC हा 5G चिपसेट वापरण्यात आला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाईल. या मोबाईलची किंमत 17,999 रुपये आहे.

जाहिरात
0406

iQoo Z6 5G: iQoo Z6 5G स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय 18W चार्जर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. iQOO Z6 5G मधील Qualcomm Snapdragon 695 चिपसेट Android 12 वर काम करतो. या स्मार्टफोनची किंमत रुपये 13,999 रूपये आहे.

जाहिरात
0506

Redmi Note 11 Pro Plus 5G: या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह हा मोबाईल येतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास या मोबाईलमध्ये ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस f/1.9 अपर्चरसह 108 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सल्सचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये पासून सुरु होते.

जाहिरात
0606

Realme 9 Pro 5G: रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित असून Realme UI 3.0 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो अॅड्रेनो 619 GPU सह येतो. या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 18,999 रुपये आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या