JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / बोला, काय खाणार? रेस्टॉरंटमध्ये आता रोबो घेतायत ऑर्डर, पाहा Photo

बोला, काय खाणार? रेस्टॉरंटमध्ये आता रोबो घेतायत ऑर्डर, पाहा Photo

जगभरात कोरोनाचं संकट असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. इतर अनेक ठिकाणी ते पाळलं जाईल, मात्र रेस्टॉरंटमध्ये ते कसं पाळायचं, हा प्रश्नच आहे. या प्रश्नावर एक जालीम उत्तर सापडलं आहे. आता वेटरचं काम करणार आहेत ते रोबो.

0104

या हॉटेलमध्ये सध्या लोकं येत आहेत, ऑर्डर देत आहेत आणि चमचमीत पदार्थांवर तावही मारत आहेत. वेटरच्या रुपात असलेल्या रोबोला ऑर्डर देणं नागरिकांना थोडं विचित्र वाटतंय. पण सोशल डिस्टन्सिंग राखण्याासाठी या पर्यायाला चांगलीच पसंती मिळत आहे.

जाहिरात
0204

आंध्र प्रदेशातील एका रेस्टॉरंटनं हे रोबो आणले आहेत. हे रोबो ग्राहकांकडून ऑर्डर घेण्याचं आणि तयार झालेली ऑर्डर ग्राहकांना देण्याचं काम करतात.

जाहिरात
0304

अशा प्रकारची सर्व्हिस ग्राहकांना सुरक्षित वाटत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासन या हॉटेलमधील गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे.

जाहिरात
0404

दोन रोबो सध्या वेटरचं काम करत असल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर नागेश यांनी सांगितलं आहे. हे रोबो पूर्णतः स्वयंचलित असून ऑर्डर स्विकारण्याचं आणि पोहोचवण्याचं काम ते स्वतःच करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या