औरंगाबाद, 31 ऑगस्ट : कालपासून उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर वस्त्या, दुकानांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्यामुळे धुळे - औरंगाबाद - सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसात कन्नड घाटात दरड कोसळली (Landslide in Kannad Ghat) आहे. ही दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, दरड कोसळल्यानंतरची दृश्य खूपच भयावह आहेत. ही दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या अडकल्याचं दिसत आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार तितुर व डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासना मार्फत देण्यात आला आहे. चाळीसगांव शहरातील विविध भागात पुराचे पाणी घुसल्याने मोठया प्रमाणात नुकसान झालंय. प्रसिद्ध पीर मुसा कादरी बाबांच्या दर्गात पाणी शिरले आहे. औरंगाबादेतही जोरदार पाऊस औरंगाबाद कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्यालगत आलेल्या बालाजी मंदिराच्या पायरिला पाणी लागलं आहे. बाजूला बालाजी भगवंताचे पुजारी कुटुंब नदिकाठी घर असल्याने त्याच्या घरात पाणी शिरले, त्यांना रात्री 3 वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूप बाहेर काढले.