मारुतीची 7 सीटर कार लॉन्च! पाहा किती आहे किंमत

मारुती सुझुकीने आज अधिकृतपणे आपली नवीन 7-सीटर कार मारुती इनव्हिक्टो देशांतर्गत बाजारात लॉन्च केलीये.

या MPV ची सुरुवातीची किंमत 24.79 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 28.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

कार बुकिंगसाठी तुम्हाला 25,000 रुपये टोकन अमाउंट जमा करावी लागेल. 

कंपनीने ही कार एकूण तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे, जी सिंगल इंजिन ऑप्शनसह येते.

मारुती सुझुकीने हे 7-सीटर आणि 6-सीटर अशा दोन्ही लेआउटसह बाजारात लॉन्च केलेय.

दिसायला ही कार Innova Hycross सारखीच आहे. पण कारच्या बाह्य भागामध्ये काही बदल आहेत.

या कारमध्ये विविध सर्वोत्तम सेफ्टी फिचर्स मिळतात. 

लेन कीप असिस्ट, ब्लाइंडेड स्पॉट मॉनिटर, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री-कॉलिजन सिस्टीम यांसारख्या सुविधा आहेत.

मारुती इन्व्हिक्टो कंपनीने फक्त एका इंजिन ऑप्शनसह सादर केली आहे. त्यामध्ये 2.0 लिटर क्षमतेचे हायब्रीड इंजिन देण्यात आलेय. 

फोनवरील जाहिराती कशा बंद कराव्यात?

Click Here