महाराष्ट्रातील असं मंदिर पाहिलं नसेल!

आपण दगडांवर कोरून लिहलेले प्राचीन शिलालेख पाहिले असतील. 

एखादा संपूर्ण ग्रंथच शिलाखंडावर कोरला असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. 

पण वर्ध्यातील गोपुरीच्या गीताई मंदिर परिसरात ही किमया केली आहे. 

विनोबा भावे यांचा 'गीताई' हा 18 अध्यायांचा ग्रंथच शिळांवर कोरण्यात आला आहे. 

गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी भगवत गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतरण होय. 

एका मराठी ग्रंथाचे शिलालेख तयार करण्याची देशातील पहिलीच योजना आहे. 

वर्ध्यातील गोपुरी परिसरातील मंदिर निर्माण कार्य 1977 पासून सुरू झालं. 

गीताई कोरण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शिलाखंड आणले आहेत. 

या शिळांचा आकार ठरवताना त्यावर हवा, पाणी, उष्णता इत्यादी परिणामांचा विचार केला गेला आहे. 

गीताई मंदिर पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरत असून देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. 

वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

Click Here