महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार प्रामुख्यानं येतो.
विदर्भातही अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्याबाबत अनेकांना माहिती नाही.
अकोल्यापासून 25 किमी वर मान व म्हैस नद्यांच्या संगमावर किल्ले बाळापूर आहे.
चंद्रपूररोडवरील भद्रावती येथे प्राचीन भक्कम बांधणीचा भांदक हा भुईकोट किल्ला आहे.
श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेले रामटेक गडमंदिर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे.
रामटेक गडमंदिरापासून अवघ्या 8 कि.मी अंतरावर भक्कम बांधणीचा नगरधन हा भुईकोट किल्ला आहे.
अकोल्यापासून सुमारे 66 कि.मी सातपुड्याच्या अभ्ययारण्यात नरनाळा हा सर्वाधिक विस्तार असणारा गिरिदूर्ग आहे.
विदर्भातील महाबळेश्वर मानलं जाणाऱ्या चिखलदरापासून अवघ्या 3 किमी अंतरावर गाविलगड किल्ला आहे.
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here