स्वातंत्र्य सैनिकांची यादी विनायक दामोदर सावरकर या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
सावरकरांनी विद्यार्थी दशेत घेतलेलं देशसेवेचं व्रत आयुष्यभर जपलं.
सावरकरांची 28 मे रोजी जयंती असून आजही त्यांचा त्याग, देशप्रेम, विचार प्रेरणादायी आहेत.
आजही देशभक्तांना प्रेरणा देणारी वास्तू म्हणजे मुंबईच्या मध्य वस्तीतील सावरकर सदन होय.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 10 मे 1937 रोजी रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली.
तेव्हा सावरकर यांनी 7548 रुपयांना शिवाजी पार्क वसाहतीतील 71 नंबरचा प्लॉट घेतला.
या प्लॉटवर सावरकर सदन ही दोन मजली इमारत उभारली.
जून 1938 मध्ये ‘सावरकर सदन’ या वास्तूत सावरकर यांचे संपूर्ण कुटुंब वास्तव्यास आले.
1963 साली माई सावरकरांच्या निधनानंतर अंगणात तुळशीचे वृंदावन बांधण्यात आले.
26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचे निधन झाल्यावर अंत्यदर्शनासाठी इथेच पार्थिव ठेवले होते.
वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया!
Click Here