वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया!

विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 

रुडयार्ड किपलिंग यांच्या 'द जंगल बुक'शी कनेक्शन असणारा हा प्रकल्प 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागातून पेंच नदी वहात गेली आहे. 

व्यवस्थापन आणि कामाच्या सोयीसाठी पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्र असे दोन भाग आहेत. 

व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र 257 चौरस किलोमीटर मध्ये पसरले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रथमच नागरिक-विज्ञानवर आधारित फुलपाखरू सर्वेक्षण झाले. 

यामध्ये 5 कुटुंबांतील 129 प्रजातींची नोंद झाली असून 49 नवीन रेकॉर्ड आणि 10 नवीन श्रेणींचा समावेश आहे. 

या प्रजातींमध्ये राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, कंजॉइन्ड स्विफ्ट, कॉमन नवाब, ब्लॅक राजा आदींचा समावेश आहे.

पेंच प्रकल्पात  तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने पहिले फुलपाखरू सर्वेक्षण केले. 

सर्वेक्षणात 11 राज्यांतील 105 जण सहभागी झाले होते. त्यात 60 पुरुष आणि 45 महिलांचा समावेश होता.

वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

Click Here