मित्राचा फोन आला, शैलेश पोलीस झाला!

ग्रामीण भागातील अनेक तरुणांचं पोलीस होण्याचं स्वप्न असंत आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. 

बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातील अनेक तरुण पोलीस भरतीकडे वळत आहेत. 

नुकताच महाराष्ट्रातील पोलीस भरती 2022 चा निकाल जाहीर झाला. 

यामध्ये बीडमधील नेकनूरचे सहा तरुण पोलीस कॉन्स्टेबल झाले आहेत. 

गवंडी कामगार असणारा शैलेश मोरे आता मुंबई पोलीस झाला आहे. 

शैलेशच्या घरची परिस्थिती हालाखीची असून आई ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार आहे. 

परिस्थितीनं भावाला शिक्षण सोडावं लागलं, तर शैलेश जिद्दीनं काम करून शिकत होता. 

घरच्या जबाबदारीमुळं उच्च शिक्षण घेणं शक्य नसल्यानं त्यानं पोलीस भरतीचा निर्णय घेतला. 

गेल्या  5 वर्षांपासून मजुरीची कामं करत शैलेश पोलीस भरतीचा सराव करत होता. 

गवंड्याच्या हाताखाली काम करत असतानाचा मित्राचा फोना आला, शैलेश पोलीस झाला. 

वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया!

Click Here