सोलापुरातील भावसार समाजाचे कुलदैवत म्हणून श्री हिंगुलांबिका देवी ओळखली जाते.
हिंगुलांबिका किंवा हिंगुला देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीचे मुळ स्थान पाकिस्तानातील बलुचिस्तान आहे.
सोलापुरात हिंगुलांबिका मंदिराची स्थापना 1898 मध्ये करण्यात आली होती.
1991 मध्ये हिंगुलांबिका देवी मंदिराचा विस्तारित जीर्णोद्धार करण्यात आला होता.
यंदा देवीच्या प्रतिष्ठापनेला 126 वर्षे होत असून त्यानिमित्त देवीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुळस्थान असणाऱ्या बलुचिस्तानातील हिंगला नदीसह सप्त नद्यांच्या जलाने देवीला अभिषेक करण्यात आला.
गणेश पूजन, वेदघोष, शांतीपाठ, कुंड संस्कार, अंकुरार्पण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हुबळी, धारवाड, शिरसी तामिळनाडू येथील घनपाठी ब्रह्मवृंद धार्मिक विधी पार पाडण्यासाठी आले.
हिंगुलांबिका मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी सोलापूरच्या पूर्व भागातील तेलुगू भाषिक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here