रंगीत करकोचावर कुणाचा डोळा?

रंगीत करकोचा ही पक्ष्यांची दुर्मीळ जात महाराष्ट्रात फक्त 4 ठिकाणी आढळते. 

राज्यातील चार ठिकाणांमध्ये लातूरचा देखील समावेश आहे. 

पिकांना कोणतीही इजा न करणारा करकोचा शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

लातूर जिल्ह्यातील शिवनी कोतल जवळ तळ्याकाठी करकोचाची घरटी आहेत.

झाडांवरील घरट्यात 250 रंगीत करकोचे 400 पेक्षा जास्त पिलांसह राहतात.

पक्षी मित्र धनंजय गुट्टे यांनी ही वसाहत शोधून काढलीय. 

आमदार धीरज देशमुख यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे करकोचाच्या संरक्षणाची मागणी केलीय. 

नुकताच करकोचाच्या घरट्यांची नासधूस केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

शिकारीच्या उद्देशानं ही नासधूस करण्यात आली असून सात पिलांचा मृत्यू झालाय.

गावकऱ्यांनी या प्रकरणात सतर्कता दाखवल्यानं आणखी नुकसान टळलं.

तीन शिकाऱ्यांना पकडून गावकऱ्यांनी वन विभागाच्या ताब्यात दिलंय. 

तलावाच्या जवळ कायमस्वरूपी वनसंरक्षक नेमण्यात यावा अशी मागणी आहे. 

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here