वर्दीतील फोटोग्राफरची कमाल! 

आणखी पाहा...!

आपले कर्तव्य बजावत असतानाच काहीजण आपला छंदही जोपासतात.

लातूरमधील धनंजय गुट्टे हे पोलीस हवालदार म्हणून काम करतात. 

निसर्गाविषयीच्या प्रेमासाठी त्यांनी एक अनोखा छंद जोपासला आहे.

निसर्गातील झाडे, वेली, वन्यप्राणी, पक्षी यांचे सुंदर क्षण ते कॅमेरात कैद करतात.

धनंजय यांना वाइल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी 4 राज्य तर 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

धनंजय हे कला शाखेचे विद्यार्थी असून निसर्ग, पशु-पक्षांबद्दल आपुलकी आहे. 

डॉक्युमेंटरी करण्यासाठी त्यांनी फोटोग्राफी करायला सुरुवात केली 

यातूनच वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद जडला.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी भटकंती करावी लागते. 

वन्यप्राणी, पक्षांसाठी तासनतास एका ठिकाणी थांबून राहावे लागते. 

खूप प्रयत्नांनी एखादा चांगला फोटो मिळतो, असे धनंजय सांगतात.

निसर्गात भटकंती करताना खूप काही सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. 

निसर्गाच्या सानिध्यात माणूस रमला की सौंदर्यदृष्टी लाभतो असे धनंजय सांगतात.

धनंजय यांनी पशु-पक्षांचे सुंदर फोटो कॅमेरात कैद केले आहेत.