पुण्यातलं ‘हे’ गाव आहे शहरापेक्षा भारी!

स्वयंपूर्ण खेडी हे महात्मा गांधींजींचं स्वप्न होतं. गांधीजींच्या स्वप्नातील भारातामध्ये ग्राम स्वराज्य ही एक महत्त्वाची संकल्पना होती.

त्या संकल्पने गाव स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशातील अनेक खेड्यांनी या दिशेनं वाटचाल सुरू केलीय.

या गावांनी स्वयंस्फुर्तीनं विकास करत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी हे यापैकीच एक आदर्श गाव आहे.

पुण्यापासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर टिकरेवाडी हे 1100 लोकसंख्या असलेलं छोटसं गाव आहे.

पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावानं देशात अनेकांना जमलं नाही, असं काम केलंय. 

टिकेकरवाडी ग्रामपंचायतीनं ओला कचरामुक्त गाव हे ध्येय निश्चित ठेवून कामाला सुरूवात केली.

​​लहान-मोठ्या गावांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरकारी इमारतीवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याची सरकारी योजना आहे.

 केंद्र आणि राज्य सरकार तसंच ग्रामपंचायतीच्या सहभागातून ही योजना राबवण्यात येते. 

या सोबचतच गावातील रिकाम्या जमिनीवरही गोबर गॅस प्लँट उभे करण्यात आलेत. 

 ज्या गावामधेये नदी, ओढे तुडुंब भरुन वाहतात त्या गावाचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी विचार केला जातो.

टिकेकरवाडीच्या ग्रामपंचायतीनं या योजनांचा फायदा घेतला. या ग्रामपंचायतीनं गावातच गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला.

या प्रकल्पाच्या सर्व कुटुंबांना गोबर गॅस उपलब्ध झालाय. त्याचबरोबर शेती आणि शेतमालही खतांच्या विरहीत फुलू लागलाय. 

त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही वाढ झालीय.

'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास

Click Here