'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास

कोल्हापूर हा जसा एक ऐतिहासिक जिल्हा आहे, त्याचबरोबर ती खवय्यांची नगरी देखील आहे.

कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील खासबाग मैदानाजवळील खाऊ गल्लीत बरेचसे खवय्ये गर्दी करत असतात.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारून खाऊ गल्ली प्रवेश करताना सुरुवातीलाच डाव्या हाताला न्यू बाळकृष्ण वडा सेंटर हे जुने दुकान दिसते.

या ठिकाणी मस्त चहा बरोबरच नताते, कांदा भजी, मिरची भजी, बटाटे भजी, पालक भजी हे चविष्ट पदार्थ मिळतात.

सध्या मिस्टर एमपी शोरमा हे दुकान ग्राहकांना आकर्षित करत आहे.

 या ठिकाणी नॉनव्हेज शोरमाचे अनेक प्रकार मिळतात. साधा शोरमा, पेरी पेरी शोरमा, मसाला शोरमा आदी पदार्थांची चव चाखायला इथे मिळते. 

या खाऊगल्लीत एक फ्लेवर्ड पाणीपुरीवाला आहे.

या ठिकाणी हाजमा हजम, पुदिना, लसूण, जिरा आणि रेग्युलर अशा 5 प्रकारात पाणी पुरी खाण्यासाठी नेहमी गर्दी असते.

सरनाईक पान शॉपमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पान खायला मिळतात

कोल्हापूरमधील 50 वर्ष जुने विक्रांत पावभाजी सेंटर याच खाऊगल्लीत आहे. येथील स्पेशल पावभाजी आणि खडा पावभाजी चांगलीच फेमस आहे.

पावभाजीच्या स्टॉलसमोरच छाया स्नॅक्स हे ब्लुमिंग ऑनियन फ्लॉवर आणि स्प्रिंग पोटॅटो रोल हे स्नॅक्स मिळणारे दुकान आहे.

खास कॅफेमध्ये मिळणारे पिझ्झा, बर्गर हे पदार्थही या खाऊ गल्लीमध्ये कोल्हापूरकरांना खाता येतात.

या सर्व वेगवेगळ्या पदार्थांच्या दुकानांबरोबरच या खाऊ गल्लीत फालुदा, कोल्ड कॉफी, तसंच वेगवेगळ्या फळांचे शेकही मिळतात.

आता रिक्षातच वाचा पुस्तकं!

Click Here