पुण्यात मिळतेय चक्क ‘बिअर’ आईस्क्रीम!
पुणे शहरात आता चक्क बिअर आईस्क्रीम देखील मिळू लागलंय.
पुण्यातील एमआयटी कॉलेज जवळच्या जंजिरा हॉटेलजवळ तुम्हाला आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार खायला मिळतात.
निर्मय पाटील या नुकत्याच बारावी पास झालेल्या 18 वर्षांच्या तरूणानं मंजिफेरा हा स्वत:चा स्टार्टअप सुरू केलाय.
त्यामध्ये चोको ब्राऊनी, मोका आलमंड, यांच्यासह अगदी सोनपापडी आईस्क्रीम देखील इथं मिळतं.
या सर्व प्रकारात येथील बिअर आईस्क्रीमची सर्वात जास्त चर्चा आहे.
निर्मय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण नॉन आल्कोहोलिक आईस्क्रीम आहे.
यामध्ये फक्त बिअरचा फ्लेवर वापरला जातो. हा फ्लेवर होप्स या वनस्पतीपासून बनवण्यात येतो.
ही कडवट वनस्पती असून यामधील कोणासारख्या असणाऱ्या भागाची चव ही बिअरसारखी असते.
त्या भागाला विशिष्ट तापमानात उकळवले जाते. त्यानंतर त्यावर योग्य प्रक्रिया करुन बिअरचा फ्लेवर तयार केला जातो.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here