वाघांना आवडतंय पेंच!

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल नुकताच जाहीर झाला.

या अहवालानुसार भारतातील वाघांची संख्या वाढली असून 3 हजार 167 वर पोहोचली आहे. 

देशातील 50 हून अधिक व्याघ्र प्रकल्पांत नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाला 8 वे स्थान मिळाले आहे. 

सर्वोत्तम मूल्यांकन प्राप्त करून पेंच व्याघ्र प्रकल्पाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

राष्ट्रीय सर्वेक्षणात पेंच व्याघ्र प्रकल्पाला 90.91 टक्के गुण मिळाले आहेत. 

व्याघ्र प्रकल्पांच्या सर्वेक्षणात देशातील 12 व्याघ्र प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रवर्गात स्थान मिळाले आहे. 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन राज्यांमधून जाणारा हा भारतातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. 

पेंच व्याघ्र प्रकल्प 292.85 चौरस किलोमिटर एवढ्या परिसरात पसरलेला आहे.

रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’मधील मोगली या पात्रामुळे पेंच जागतिक पातळीवर नावारूपास आले.

टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी पेंच व्याघ्र प्रकल्पाची ख्याती आहे. 

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here