200 पक्ष्यांचे आवाज काढणारा बर्ड मॅन!
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वांच्याच परिचयाचा आहे.
अलीकडच्या काळात याच ताडोबातील 'बर्ड मॅन'ची चांगलीच चर्चा आहे.
सुमेध वाघमारे असं या बर्ड मॅनचं नाव असून ते 200 हून अधिक पशु-पक्ष्यांचे आवाज काढतात.
सुमेध हे मुळचे हिंगोली जिल्ह्यातील कलगाव येथील रहिवासी आहेत.
लहानपणापासूनच सुमेध यांना पशु-पक्ष्यांची प्रचंड आवड होती.
निसर्गाच्या सानिध्यात राहून ते प्राणी व पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढायला शिकले.
सुमेध मोर, पोपट, कावळा, कोकिळा, भारद्वाज, बुलबूल, कोंबडा आदी पक्ष्यांचे आवाज काढतात.
गाय, म्हैस, शेळी, कोल्हा, कुत्रा अशा प्राण्यांसह डासांच्याही आवाजाची ते नक्कल करतात.
अभिनेते सयाशी शिंदे, निर्माते नागराज मंजुळे यांच्याशी भेटीनंतर सुमेधची देशभर चर्चा झाली.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांपुढे सुमेध आपली कला सादर करतात.
सुमेध हे जंगल संवर्धन, जतन आणि संगोपन व्हावे यासाठी प्रबोधन देखील करतात.
सुमेध यांच्या कलेमुळे पर्यटकांना जंगल सफारीसह मनोरंजनाची मेजवानीही मिळत आहे.
सुमेध यांच्या या अनोख्या कलेचा विविध ठिकाणी गौरव होत आहे.
वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!
Click Here