वाघांच्या राज्यात मगर अन् कासव!

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीपात्रात मगरी आणि कासव यांचा अधिवास आढळून आला आहे. 

नुकतेच पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिले मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले.

सहभागी चमूनी अंदाजे 200 किमी नदीच्या लांबीचे सर्वेक्षण केले यात 30 मगरी आढळल्या.

24 गुफा, नांदपूर संरक्षण कुटी ते किरगीसर्रा पर्यंतच्या पट्ट्यात मगरींची सर्वाधिक घनता आढळली.

पेंचमध्ये पहिल्यांदाच तोतलाडोहात लीथच्या सॉफ्टशेल कासवाची नोंद झाली. 

या सर्वे करिता तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी तीनसा इकोलॉजिकल फाउंडेशनची मदत घेण्यात आली. 

मच्छीमार बोटींचा वापर करत 'मॉडिफाइड बेल्ट ट्रान्सेक्ट ऑन बोट' ही पद्धत वापरून सर्वेक्षण केले. 

संवर्धनास मदत करण्यासाठी लगतच्या भागात 'मगरमित्र' उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.

सर्वेक्षणात गोळा केलेल्या माहितीच्या आधारे एक अहवाल तयार केला जाईल .

मगर आणि कासव या दोन्ही प्राण्यांची नदीतील घनता आणि अधिवासाचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. 

वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

Click Here