कॅन्सरला हरवणारा दानवीर!

सेवानिवृत्त झाल्यावर कमावलेल्या जमापुंजीत निवांत जगण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. 

पण नागपुरातील एका अवलियानं आपल्या आयुष्याची कमाई दान केली आहे. 

66 वर्षीय निलेश साठे हे LIC चे माजी कार्यकारी संचालक व IRDA मधून सेवानिवृत्त झाले. 

1972 मध्ये साठे यांच्या आईला कर्करोग झाला, तेव्हा नागपुरात उपचार नव्हते. 

मुंबईत उपचार घेऊन बरं झाल्यावर पुन्हा कॅन्सर झाला व 2005 मध्ये आईचं निधन झालं.

पुढे 2012 मध्ये साठे यांना कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यांनीही मुंबईत उपचार घेतले. 

साठे यांना पुढे कर्करोगानं तीनवेळा गाठलं, मात्र त्यांनी त्यावर मात केली. 

सेवानिवृत्तीनंतर मिळणारं उत्पन्न आपलं नाही असा विचार करून त्यांनी पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. 

नागपुरात नुकताच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

साठे यांनी 1 कोटी रुपयांचा निधी नागपुरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेला दान दिला. 

गावाकडचे नुडल्स सरगुंडे!

वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया!

Click Here