नागपुरात आहे अजब बंगला!

नागपूर शहारातील मध्यवर्ती भागात असलेला हा अजब बंगला सर्वांचेच लक्ष वेधतोय. 

महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय म्हणून या मध्यवर्ती संग्रहालयाची ओळख आहे. 

सन 1863 मध्ये मध्य प्रांताचे कमिशनर सर रिचर्ड टेम्पल यांनी संग्रहालयाचा पाया घातला. 

संग्रहालयाची इमारत बांधून त्याला ‘सेंट्रल म्युझियम नागपूर’ असे नाव देण्यात आले.

7 मे 1863 रोजी सुरू झालेलं हे संग्रहालय मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी आहे.

या जुन्या संग्रहालयात भूगर्भ व प्रागैतिहासिक, प्राणी (स्टफ), पक्षी यांची दालने आहेत. 

तसेच आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, शिलालेख, मूर्ती आदी दालनेही लक्ष वेधून घेतात. 

दख्‍खन, जयपुरी, उदयपूर, बिकानेर, पहाडी, मराठी शैलीतील पेंटिंग येथे बघायला मिळतात.

विदर्भातील पुरातन आणि दुर्मिळ ठेवा या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलाय. 

संग्रहालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दृकश्राव्य पद्धतीने माहिती मिळते. 

गावाकडचे नुडल्स सरगुंडे!

संग्रहालय सोमवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या खुले राहतं. 

Click Here

गावाकडचे नुडल्स सरगुंडे!

या संग्रहालयातील प्रवेश शुल्क 15 वर्षा खालील पर्यटकांसाठी 5 तर वरील 10 रुपये आहे. 

गावाकडचे नुडल्स सरगुंडे!

शैक्षणिक सहलीसांठी पूर्व परवानगीने प्रति विद्यार्थी 1 रुपया आकारला जातो.

गावाकडचे नुडल्स सरगुंडे!

वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया!

Click Here