देशसेवेचा वारसा जपत सिद्धीची भरारी!

देशातील मुली आता सर्व क्षेत्रात आघाडीवर असून भारतीय सैन्य दलातही भरती होत आहेत. 

नागपुरातील सिद्धी दुबे ही वयाच्या 22 व्या वर्षी नौदलात फ्लाइंग पायलट झाली आहे.

देशसेवेसाठी कार्यरत असणारी सिद्धी ही तिच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. 

सिद्धीचे आजोबा भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि तिचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले. 

नौदलात फ्लाइंग पायलटसाठी 396 जणांमधून 4 जणांची निवड करण्यात आली. 

भारतीय नौदलातील महिला वैमानिकांची ही दुसरी तुकडी असून पहिल्या बॅचमध्ये 1 महिला फ्लाइंग पायलट होती. 

सिद्धीने 2022 मध्ये नागपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. 

तीन वर्षांच्या एनसीसी प्रशिक्षणादरम्यान सिद्धीने विमान उडवले होते. 

नौदलातील निवडीदरम्यान तिला संगणकीय चाचणी आणि शारीरिक चाचणी यातून जावे लागले. 

सिद्धी तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देते. मुलीचा अभिमान असल्याचं आई-वडील सांगतात. 

वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

Click Here