MBA नंतर आता ऑडी चायवाला!

दिवस असो वा रात्र चहा शौकीन कितीही वेळा चहाचा आस्वाद घेऊ शकतात.

मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला चहा टपरी किंवा सायलवर चहा विकणारा नक्की दिसेल. 

एक वेळ खायला काही मिळणार नाही. पण मुंबईत चहा कुठल्याही वेळेत अगदी रात्री दोन वाजता पण मिळेल. 

 मुंबईत वेगवेगळ्या ब्रँण्डचे चहाचे स्टॉल आहेत. एमबीए चहावाला, ग्रॅज्युएट चहावाला असे नवे ट्रेंड देखील सुरू झाले आहेत.

त्यातच आता आणखी एकाची भर पडलीय. ती म्हणजे ऑडी चायवाला...

ऑडी गाडी वापरणे हे प्रतिष्ठेचं समजले जाते. या महागाड्या गाडीतून फिरणं हे अनेकांचं स्वप्न असतं.

पण, मुंबईतील दोन तरूण सत्तर लाखांच्या या लक्झरी ऑडीचा उपयोग चहा विक्रीसाठी करत आहेत. 

पंजाबच्या मलेरकोट येथील अमित कश्यप आणि हरियाणाच्या हिस्सारी मंगलीतील मनू शर्मा यांनी ऑडीमध्ये चहाचा स्टॉल सुरू केला आहे.

त्याच्याकडे एक कप चहाची किंमत 20 रुपये आहे. दिवसभरात 300 ते 400 कपची विक्री होते

अमित आणि मनू हे दोघंही बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आले आहेत.

बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यापूर्वी काही तरी व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. 

'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास

Click Here