‘इथं’ चक्क मिळतोय टोमॅटो वडापाव!

मुंबईकरांना रोजच्या धावपळीत भूक लागल्यानंतर सर्वात प्रथम वडापावची आठवण येते. 

मुंबईच्या फस्ट लाईफला साजेसा हा पदार्थ मुंबईतच सुरू झाला आणि चांगलाच रूजला. 

शहराच्या प्रत्येक भागात वडापावचा एकतरी फेमस गाडा आहे. 

 आपला वडापाव इतरांपेक्षा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

तो बनवण्यापासून ते त्यामध्ये मिळणाऱ्या चटणीपर्यंत ग्राहकांना वेगळं देण्याचा विक्रेता प्रयत्न करतो.

वडापावच्या या गर्दीत धारावीत मिळणारा टोमॅटो वडापाव हटके ठरतोय. 

धारावीतील संत रोहिदास रोडवर महेंद्र काळे हे गेल्या दहा वर्षांपासून वडापावचा व्यवसाय करत आहेत. 

त्यांच्या  स्टॉलवर वडापाव, सँडविच, भजी पाव असे नेहमीचे पदार्थ मिळतात. 

त्याचबरोबर येथील टोमॅटो वडापाव देखील चांगलाच फेमस आहे.

या वडापावची किंमत 15 रुपये आहे. 

'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास

Click Here